छगन भुजबळांवर टीका करण्याएवढे तुम्ही मोठे नाही ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोल

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी |बिकन शेख,

आम्ही व्यक्तीद्वेषाचे राजकारण करणारे नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भुजबळांविषयी केलेली टिपणी करण्याअगोदर स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुठल्या आरोपाखाली जेलमध्ये होते आणि नंतर कसे जामिनावर सुटले याचा अभ्यास करावा भुजबळांवर बोलण्या इतपत देवेंद्र फडणवीस मोठे नसून भुजबळांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विचार करायला हवा होता अशी सडकावून टीका शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ व धनराज महाले यांच्या प्रचारार्थ गिरणारे येथे आयोजित सभेत बोलत होते.

पंकजा आणि सुजय यांच्यात हे संबंध, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माधवराव पाटील, आमदार निर्मला गावित, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, डॉ.अपूर्व हिरे, जयवंतराव जाधव, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, अॅड.भगीरथ शिंदे, श्रीराम शेटे, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, अण्णासाहेब कटारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, गोविंद पगार, बाळासाहेब वाघ, मुरलीधर पाटील, नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, अॅड.संदीप गुळवे, अॅड. रवींद्र पगार, अर्जुन टिळे, शिवाजी सहाणे, कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, हिरामण खोसकर, परवेज कोकणी, गणेश उन्हवणे,रंजन ठाकरे, रत्नाकर चुंभळे, विजयश्री चुंभळे, संपतराव सकाळे, सचिन पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, अपर्णा खोसकर, प्रेरणा बलकवडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्षांच्या आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ठिकाणी राहुल गांधीची सभा घेवून विखे पाटलांना कॉंग्रेसचे ‘चले जाव’ संकेत ?

यावेळी शरद पवार म्हणाले की, देशातील कोणत्या राज्याचे सदन दिल्लीत उत्तम आहे तर ते केवळ महाराष्ट्र सदन असून भाजपचे सर्वच लोक या ठिकाणी बैठका घेतात असे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की भाजपची वाटचाल ही हुकूमशाहीच्या वाटेने सुरू असून सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

पुणे मनपात नोकरी लावतो या आमिषाने लाखोंना लुटणारा कामगार संघटनेचा अध्यक्ष गजाआड

ते म्हणाले की, या देशातील लोकांनी अनेक निवडणूका बघितल्या त्यांनी जनतेच्या हिताचे सरकार निवडून दिले मात्र त्यात अपवाद केवळ २०१४ ची निवडणूक आहे. भाजपने अनेक घोषणा देऊन जनतेची फसवणूक केली. जनसामान्य जनतेच्या हिताची जपवणूक करणारे सद्याचे सरकार नाही. मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आघाडी सरकारच्या काळातही आत्महत्या झाल्या. मात्र त्यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्याने सन्मानाने जगण्यासाठी कर्ज माफीचा निर्णय घेतला मात्र सद्याच्या सरकारने शेतकरी आत्महत्या होत असताना कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्याला पुन्हा कर्जमाफीची गरज आहे. सत्तेत आल्यावर ती आम्ही देऊ असें त्यांनी यावेळी सांगितले.

विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार

पंतप्रधान नाशिकला येऊन गेले मात्र शेती आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणे नाही केवळ मतांचा जोगवा त्यांनी मागितला त्यांना त्याची लाज कशी वाटत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्य कसे चालवायचे याबाबत काही बोलता न येणारे मोदी केवळ गांधी कुटुंबियांची बदनामी करत आहे. ज्या गांधी कुटुंबीयांनी या देशासाठी आपले बलिदान दिले गरिबी निर्मूलन करण्याचे काम देशासाठी केले देशातील सर्वसामान्य जनतेला सन्मानाने उभे केले त्यांच्यावर बोलणे हे मोदींना पटते का अशी टीका शरद पवार यांनी केली. तसेच मोदींनी गांधी कुटुंबीयांनी काय केले हे विचारण्यापेक्षा गेल्या पाच वर्षात जी आश्वासने तुम्ही जनतेला दिली त्याचे काय झाले यावर बोला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज

मनमोहन सिंग सरकारच्या काळात जी विमाने ४५० कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार होती ती आता १६५० कोटी रुपयांना घेतली जात आहे. आणि ज्या अंबानींनी कधी कागदाचे विमान बनविले नाही त्यांना विमान बनविण्याचे कंत्राट देण्यात आलं. कॉंग्रेसच्या काळात नाशिकच्या एचएलला विमान बनविण्याचे धोरण आखले मात्र आता भाजपने ते खाजगी कंपनीला देण्याचा घाट घातला जात असल्याची टीका त्यांनी केली. देशातील ज्या संस्था जतन करण्याची गरज आहे त्या संस्था मोडीत काढण्याची प्रकार केला जात आहे त्यामुळे या हुकूमशाही सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी नाशिकमधून समीर भुजबळ आणि दिंडोरीमधून धनराज महाले या दोन तरुणांना दिल्लीत पाठवा असे आवाहन शरद पवारांनी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील म्हणाले की, भाजप शिवसेना सरकारने जनतेला फसवणूक केली असून त्याबाबत त्यांनी नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या खोट्या आश्वासनांची चित्रफीत दाखवून जगाच्या पाठीवर भाजप सारख खोटं बोलणारा पक्ष नसल्याची टीका त्यांनी केली. समीर भुजबळ यांनी शपथपत्राच्या माध्यमातून नाशिकचे प्रश्न मार्गी लावण्याची हमी दिली आहे आणि नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आघाडीची सत्ता आल्यास कर्जमाफी करण्याची भूमिका जाहीरनाम्यात केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, पिंपळगाव येथील सभेत मोदींनी नाशिकमधील ज्या सप्तरंगाची उधळण केली त्यांच्या विकासासाठी मोदींनी एक दमडीही दिली नाही तर छगन भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकासकामे केली असल्याची टीका करत मोदी साहेब आपने तो कुछ नहीं किया अशा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले की शिवसेनेकडून समीर भुजबळ यांच्या विरोधात खोटी माहिती पसरविली जात आहे. आमच्यावर आरोप झाले असले तरी ते बिनबुडाचे असून त्यातून आम्ही निर्दोष सुटू. मात्र ज्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली तर आम्हीत शहा यांना खुनाच्या आरोपांखाली अटक झाली त्यांना उमेदवारी कशी दिली याचाही खुलासा करावा असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

ते म्हणाले की, खुद्द भाजपच्या बांधकाम मंत्र्यांच्या सहीने छगन भुजबळ यांना क्लीन चिट दिली आहे. ज्या शिवसेनेच्या संजय राऊत यांनी आम्ही तुरुंगात असल्यावर छगन भुजबळ यांच्यावर केलेले आरोप खोटे असून सरकार तोंडघशी पडेल असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. भुजबळांवर अन्याय झाल्याच्या बातम्या आपल्या मुखपत्रातून छापल्या तेच आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आमच्यावर आरोप करत आहे. राज्यात दाभोळकर पानसरे यांच्या हत्तेचा तपास लागत नसल्याने हायकोर्टाने फटकारले आहे. तसेच ज्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सैनिक शहिद झाले ते देशाचे पंतप्रधान मोदी शहिदांच्या नावाने मत मागत असल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी समीर भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांनी विश्वास टाकल्याने २००९ ते २०१४ या काळात दिलेली वचने पूर्ण केली. आणि पुन्हा एकदा शपथपत्राद्वारे नाशिकच्या जनतेची विकास कामे पूर्ण करू असा विश्वास व्यक्त करत नाशिक लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मतदारसंघाच्या प्रगतीसाठी संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

हंसराज वडघुले म्हणाले की, कांदा आणि द्राक्षासाठी प्रक्रिया उद्योग राबविण्यासह अनेक आश्वासने दिली मात्र सर्व आश्वासने खोट ठरली. पंतप्रधानांच्या सभेसाठी खंदक उभारण्याची गरज पडली अशा खंदकाना शेतकरी भीक घालत नाही ते कशाही प्रकारे निषेध व्यक्त करू शकतात असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकीच्या काळात नोटिसा देऊन आवाज दाबण्याचा प्रकार केला जात असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची टीका केली.

सरकारने केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नसून कर्जवसुली सुरू असल्याची टीका माजी खासदार देविदास पिंगळे यांनी केली. तर लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा सद्याच्या सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचे आमदार निर्मला गावित यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रस्ताविक माजी आमदार जयवंतराव जाधव यांनी केले.