नवी दिल्ली । 2021 हे वर्ष कोरोनामध्ये संमिश्र वर्ष ठरले. व्यवसाय पुन्हा रुळावर येण्यासाठी संघर्ष करत असताना, आर्थिक बाजार आणि क्रिप्टोकरन्सीसाठी हे वर्ष चांगले राहिले आहे. रिटेल इक्विटी गुंतवणूकदारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक आली.
गेल्या वर्षी भारतीय बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उंची गाठली होती. Paytm, Zomato, Nykaa आणि Policybazaar सारख्या 63 कंपन्यांनी 1.2 लाख कोटी रुपये उभे केले आहेत. एका वर्षात IPO दरम्यान जमा झालेली ही सर्वाधिक रक्कम आहे. मात्र फक्त शेअर बाजारच आहे, जिथून पैसा कमावता येईल? तर स्टॉक मार्केटसह 3 असे उत्तम पर्याय आहेत, ज्यातून तुम्ही 2022 मध्ये पैसे कमवू शकता.
शेअर मार्केट
चांगल्या दर्जाचे ब्लू-चिप किंवा मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक देखील मजबूत रिटर्न देऊ शकतात. मात्र तुमची गुंतवणूक दीर्घकालीन असावी. हा कालावधी किमान 3-5 वर्षांचा असावा. भारतीय अर्थव्यवस्था महामारीतून सावरत आहे आणि विविध क्षेत्रातील अनेक सुधारणा पुढील काही वर्षांत चांगल्या दर्जाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती उच्च पातळीवर नेतील.
नॅशनल पेन्शन योजना (NPS)
ही केंद्र सरकारची योजना आहे ज्याचा उद्देश तुम्हाला निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न देणे हा आहे. हे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे मॅनेज केले जाते, जी भारतातील पेन्शन निधीची नियामक संस्था आहे. NPS ही एक संकरित गुंतवणूक योजना आहे, जी इक्विटी आणि कर्ज दोन्हीमध्ये गुंतवणूक करते.
NPS मध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्ही जिवंत राहेपर्यंत तुम्हाला निश्चित मासिक पेन्शन मिळेल आणि रिटायरमेंटच्या वेळी एकरकमी रक्कम देखील मिळेल. तुम्ही NPS मधून मॅच्युरिटी रकमेच्या 60 टक्क्यांपर्यंत एकरकमी पैसे काढू शकता आणि उर्वरित रक्कम जीवन विमा कंपनीकडून एन्युइटी खरेदी करावी लागेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
SCSS मध्ये रु. 1,000 च्या पटीत जास्तीत जास्त रु 15 लाख गुंतवले जाऊ शकतात. या योजनेतील व्याज दर तिमाहीत जमा केले जाते जेणेकरून ते नियमित उत्पन्नाची आवश्यकता पूर्ण करू शकेल. SCSS खाते पाच वर्षांत मॅच्युर होते, त्यानंतर ते तीन वर्षांच्या ब्लॉकसाठी पुन्हा एकदा वाढवले जाऊ शकते. लहान बचत योजनांच्या व्याजदरात कपात करूनही, SCSS चालू तिमाहीसाठी 7.4 टक्के दर देऊ करत आहे.