पालघरमध्ये भरदिवसा तरुणीवर गोळीबार, Live Video आला समोर

0
1128
shot dead
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर : हॅलो महाराष्ट्र – पालघर मधून एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने तरुणीवर भर दिवसा गोळीबार (shot dead) केल्याची घटना पालघर मध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

बोईसर परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत (shot dead) तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी तरुणाने सीआयएसएफच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचाही मृत्यू झाला .ही संपूर्ण घटना प्रेमप्रकरणावरून करण्यात आल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. बोईसर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता हा आरोपी तरुण तरुणीचा पाठलाग करत होता आणि भर रस्त्यात त्यांनी तिच्यावर गोळीबार (shot dead) केला. हे पाहून आसपासच्या लोकांनी भीतीने तिथून पळ काढला. मृत तरुणीचे नाव स्नेहा दिनेश कुमार मेहतो, तर आरोपी तरुणाचे नाव कृष्णा यादव असे असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तरुणाजवळील रिवाल्वर जप्त केली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!