Wednesday, March 29, 2023

दुर्दैवी! व्यायाम करताना ह्रदय विकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू; पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी । पोलिस अधिकारी व्हायचे या एकाच ध्येयाने व्यायाम आणि अभ्यास करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील अमोल पांडुरंग शिंदे या २२ वर्षाच्या तरुणांला व्यायाम करत असतानाच ह्दय विकाराचा तीव्र झटका आल्यानं त्याचा जागेवरती दुर्दैवी मृत्यु झाला. ऐन तारुण्यात काळाने घाला घातल्याने अमोलचे पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

अमोलची पोलिस अधिकारी बनण्याची ईच्छा होती. तसे तो प्रयत्न ही करत होता. व्यायाम आणि अभ्यास करण्यासाठी दोन महिन्यापासून पुणे येथील एका खासगी अकॅडमीत तो सराव करत होता.

- Advertisement -

दोन दिवसापूर्वीच तो आपल्या मुंढेवाडी या गावी आला होता. गावी आला तरी त्याची धडपड आणि जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. नेहमीप्रमाणे व्यायामासाठी तो घराबाहेर पडला. जवळपास चार किलोमीटर अंतर रनिंग केले. रनिंग करत असतानाच घरापासून अवघ्या एक किलोेमीटर अंतरावर आल्यानंतर त्याच्या छातीत वेदना सुरु झाल्या. याच वेळी जोराचा ह्रदयविकाचारा धक्का बसला. त्यातच त्याचा मृत्यु झाला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.