व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर..म्हणत तरुणानं तलावात उडी मारुन सगळंच संपवलं

औरंगाबाद – इंस्टाग्रामवर ‘आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे करून हजारो मे हम नही मिलेंगे’ असे स्टेटस ठेवून आणि आत्महत्या करीत असल्याचा मित्राला कॉल करून पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचे शो आज हर्सूल तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली. तरुणाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा घाटी परिसरात आलेले त्याचे मित्र करीत होते. कुणाल काकासाहेब देहाडे (19, रा. सराफा गल्ली, सिटी चौक) असे मृताचे नाव आहे.

याविषयी हर्सूल पोलिसांनी सांगितले की, कुणाल हा वडिलांसोबत रंगकामाचा (पेंटर) ठेका घेत असे. 31 डिसेंबर रोजी त्याने सकाळी दुचाकीवर वडिलांना चिकलठाणा एमआयडीसीतील एका संस्थेत सुरू असलेल्या कामावर नेऊन सोडले. यानंतर तो दुचाकी घेऊन तेथून बाहेर पडला. एका मित्राला फोन करून तो आत्महत्या करणार असल्याचे म्हणाला. नंतर त्याने फोन बंद केला. नंतर त्याने हर्सूल तलाव गाठला. तेथून पुन्हा मित्राला कॉल करून आत्महत्या करण्यासाठी तलावावर आल्याचे त्याने सांगितले.

आदल्या दिवशी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट ठेवली होती. यात त्याने म्हटले होते की, ‘आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर उन हजारो में हम नहीं मिलेंगे.’ ही पोस्ट वाचून मित्राने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक आणि मित्र त्याचा शोध घेत होते. तो हरवल्याची तक्रार सिटी चौक ठाण्यात नोंदविण्यात आली होती.

तलावाजवळ त्याची मोटारसायकल आढळून आली होती. यामुळे अग्निशामक दलाचे जवान चार दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. मात्र यात यश आले नव्हते. आज सकाळी कुणालचे प्रेत तरंगताना दिसले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ते काढले, तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. याविषयी हर्सूल ठाण्यात नोंद करण्यात आली.