धक्कादायक! संतोष देशमुख यांच्या अमानुष अत्याचाराचे फोटो पाहून तरुणाची आत्महत्या

0
2785
Santosh Deshmukh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. सोमवारी रात्री या अमानुष अत्याचाराचे काही फोटो समोर आले. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महत्वाचे म्हणजे, हे फोटो पाहून बीडमधीलच (Beed) एका तरुणाने धक्कादायक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता गावात त्या नावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील धकादायक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हेच फोटो बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात 23 वर्षीय तरुण अशोक शिंदे (Ashok Shinde) याने देखील पाहिले. परंतु हे फोटो पाहिल्यामुळे अशोक शिंदे यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला. शेवटी त्याने मानसिकता तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याला त्याच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या क्रूर अत्याचाराचे फोटो पाहून अशोक शिंदे अत्यंत अस्वस्थ आणि भावनिक झाला होता. त्याने आपल्या गावातील मित्रांसोबत या घटनेवर चर्चा केली. मात्र, घरी जाऊन येतो असे सांगून तो निघून गेला आणि त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. परिणामी आता या दोन्ही घटकांमुळे गावातील वातावरण अधिक तापले आहे. यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल (4 मार्च) जानेगाव संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. या बंदमध्ये अशोक शिंदे सक्रीय होता, मात्र त्याच्या अचानक आत्महत्येने गावात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भावनिक आवाहन केले आहे की, “लढाई ही संयमाने लढायची असते. एक एक मावळा अशा प्रकारे कमी होत गेला, तर ही लढाई आपण कशी लढणार?”

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोपपत्रात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांना तपासा दरम्यान वाल्मिक कराडने आपल्या 3 आयफोनमधील डाटा डिलीट केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र एसआयटीने तो डेटा रिकव्हर केला आहे. त्यामुळे पुढील कारवाईसाठी हा डेटा महत्त्वाचा ठरणार आहे.