रेशनकार्डवर कुत्रा नाव टाकल्याने त्याने कुत्र्याचा आवाज काढत अधिकाऱ्यांना घातला घेराव

Srikanthikumar Dutta social media
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेशनकार्ड हे सर्व नागरिकांना सरकारने दिलेले एक दस्तऐवज आहे. मात्र, या रेशनकार्डवर नाव चुकल्यास आपण ते अधिकाऱ्यांना सांगून बदलून घेतो. अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असेल तर संतापही व्यक्त करतो. अशीच घटना पश्चिम बंगाल येथील वांकुरा येथे घडली आहे. येथील तरुणाचे रेशनकार्डवर श्रीकांतीकुमार दत्ता आडनावाऐवजी श्रीकांतीकुमार कुत्ता असे नाव टाकल्याने त्याने कुत्र्याचा आवाज काढत अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

झालं असं की, पश्चिम बंगाल येथील तरुण श्रीकांतीकुमार दत्ता यांनी रेशनकार्डमध्ये आपले नाव बदलण्यासाठी पुरवठा अधिकाऱ्यांकडे अर्ज दिला होता. कारण त्यांचे रेशनकार्डमध्ये श्रीकांतीकुमार दत्ता ऐवजी कुत्ता असे अधिकाऱ्यांकडून रेशनकार्डवर नाव टाकण्यात आले होते. या तरुणाने अनेकवेळा अर्ज करून कर्मचाऱ्यांना भेटून आपले नाव रेशनकार्डवरून बदलून द्यावे, अशी मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून तरुणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते.

अखेर संतापलेल्या श्रीकांतीकुमार या तरुणाने अधिकाऱ्यांची भर रस्त्यात गाडी आडवली. अधिकाऱ्यांनी गाडी थांबवताच तरुणाने कुत्र्याचा आवाज ककाढायला सुरुवात केली. तरुणाने कुट्याचा आवाज काढताच अधिकारीही चक्रावून गेले. हि घटना रस्त्यावरच घडल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली. तरुणाचा संताप पाहताच अधिकाऱ्यांनी गाडीतून उतरत तत्काळ त्या तरुणाचे नाव बदलून देण्याच्या सुचा कर्मचाऱ्यांना दिल्या.