Tuesday, March 21, 2023

आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 180 आमदारांसह काल गुवाहाटी गाठली. यावेळी त्यांनी तेथील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. या भेटीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

आसाममध्ये सेवा बजावणाऱ्या मराठी भाषी राजपत्रित अधिकाऱ्यांनी मिळून सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळानं आसाममध्ये सांस्कृतिक भवन उभारावं, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घेण्यात आली आहे. आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक महामहाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांच्या संस्कृतीत अनेक साम्यस्थळं असून ही दोन राज्य सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ यावी यासाठी आसाममध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

आसाम मधील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनात महाराष्ट्र आणि आसाममधील लोकसंस्कृती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवण्यात येणार आहेत. तसेच या कामासाठी राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे यांची विशेष समन्वयक म्हणून नियुक्ती देखील करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.