प्रितमताईंना शोधा १ हजार रुपये मिळवा, खासदार प्रितम मुंडेंना बीडच्या तरुणाचे खूलेपत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । भाजप खासदार प्रीतम मुंडे मतदार संघातील समस्यांकडे लक्ष देत नाहीत अशी तक्रार करत एका तरुणाने मुंडे यांना खुले पत्र लिहिले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावित खासदार प्रीतम मुंडे मतदार संघात नसल्याने निदान आता तरी प्रीतमताईंनी बीडला यावे असे आवाहन सदर युवकाने केले आहे. अक्षय मुंडे नावाच्या युवकाने फेसबुकवर हे पत्र पोस्ट केले आहे. संपूर्ण पात्र खाली दिले आहे.

नमस्कार प्रितमताई,
मी एक बीड चा नागरिक आणि आपल्या मुंडे परिवारावर निस्सीम प्रेम करणारा आपला लहान भाऊ या नात्याने आपल्याला हे पत्र लिहितोय. सध्या कोवीड-19 या विषाणूने सर्व जग परेशान आहे. आज दिनांक 8 एप्रिल रोजी आपल्या भारतात 5500+ पेक्षा ही जास्त रुग्ण आहेत. आणि त्यात आपला महाराष्ट्र 1100+ ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे. काल पर्यंत आपल्या जिल्हात एकही रुग्ण नव्हता पण आज आपला शून्य फुटलाय. आत्ता पर्यंत पालकमंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब,  एसपी साहेब, अशोक थोरात साहेब खूप छान नियोजन करत आहेत. पण या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट सतत खुपत आहे की आपण कोठे आहेत ? समाजाच्या / बीड जिल्ह्याच्या माता म्हणवून घेणाऱ्या आपल्या मोठ्या भगिनी कोठे आहेत ? अश्या वेळी आपण स्वतः डॉक्टर असून गायब राहणे चुकीचे वाटते ना ताईसाहेब !

जिल्ह्याचे पालकमंत्री आपले नावडते भाऊ, जिल्हाधिकारी, एसपी, आरोग्य अधिकारी, समाज कल्याण अधिकारी आदी सर्व तरुण मंडळी एकदिलाने ही लढाई लढत आहे. त्यांनी घेतलेल्या कोणत्याही बैठकीला किंवा निर्णय प्रक्रियेत आपण दिसला नाहीत, याची खंत वाटते.

आपले विविध व्हीडिओ पाहिले, जिल्ह्याबाहेर अडकलेल्या लाखभर ऊसतोड मजुरांची प्रशासन युद्ध पातळीवर व्यवस्था करण्यात व्यस्त असताना, त्यांना जिथे आहेत तिथेच ठेवणे योग्य आहे हे कळत असूनसुद्धा आपण प्रशासनाला सहकार्य करायचे सोडून, तो विषय आवडत नसलेल्या भावाच्या मंत्रालयात येतो म्हणून आपण साधलेलं निव्वळ राजकारण मुंडे परिवाराचा एक भक्त म्हणून अजिबात आवडलं नाही ताई!

आपण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून 25 लाख रुपयांची मदत केली हे समजले. ऐकून छान वाटले पण, मला एका गोष्टीचे उत्तर द्या. जर महाराष्ट्रात भाजपा चे सरकार असते तर आपण PM – CARES मदत केली असती का ? नाही ना कमीत कमी अर्धे महाराष्ट्रसाठी आणि अर्धे देशासाठी दिले असते. पण अश्यावेळीही आपण राजकारण करत सर्व पैसे PM – CARES ला दिले. यात किती टक्के रक्कम आपल्या राज्याला मिळेल ? आधीची च थकबाकी केंद्र सरकार देत नाहीये. भाजपचे केंद्रातील सरकार एवढं खालच्या पातळीचे राजकारण का करता हे काही समजले नाही..! आणि हो केंद्र सरकारने आरोग्यविषयक फंड देणे कंपलसरी केलेलं असताना तो फंड दिल्याचे सांगून त्याचं मार्केटिंग कसलं करता हो? कसं जमतं तुम्हाला देव जाणे!
  
बाकी आपले मानलेल्या भावांनी मदतीच्या वेळी ही स्वतः ची आणि पक्षाची मार्केटिंग मध्ये कसलीही कमी पडू दिली नाहीये. ते म्हणतात ना चार आन्या ची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला..! तसाच प्रकार बीड भाजपा करत आहे.

आणि ते सुरेश धस साहेबांना नवीन ऑफर काढावी लागेल. प्रीतमताई शोधा 1000 रुपये मिळवा कारण आपला काही ठाम पत्ताच लागत नाहीये. बाळ अगस्त्य ला कुकिंग शिकवणे खूप झाले. आता जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झालाय, एक डॉक्टर या नात्याने तरी होईल तेवढे लवकर बीड जिल्ह्यात परत या ताईसाहेब..! आपल्या सारख्या सुजाण खासदाराकडून आम्हाला व आपल्याला लाखांनी मतं दिलेल्या आपल्या परिवारावर प्रेम करणाऱ्या लोकांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. नुसते बोलून भागणार नाही, प्रत्यक्ष काम करावे लागेल; नाहीतर मोठ्या ताईसाहेबांकडून बाकीचं शिकला असालच!

धन्यवाद..!

अक्षय मुंडे
संपर्क क्रमांक : ९६५७४००६१६

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1349536841899419&id=100005293486921