धक्कादायक! पोलीसांच्या हाप्त्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उल्हासनगर प्रतिनिधी |पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्लासनगर येथे उघडकीस आला आहे. हप्ता मागत असलेल्या पोलीसांचा त्रास सहन होत नसल्याने तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.

सतीश खेडकर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो हॉटेल चालक आहे. त्याला पोलीस हप्ता मागून सतत त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने आपले जीवन संपवले आहे. या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस खाते आपले रक्षक आहे कि भक्षक आहे असा सवाल लोकांकडून उपस्थित केला जात आहे.

तरुण मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसलेल्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यापुढेच धरणे आंदोलन सुरु केले आहे. हाप्ते वसुलीसाठी एवढ्या प्रमाणात त्रास देण्याची घटना पोलीस खात्यावरच प्रश्न चिन्ह उभा करते . हप्त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याची हि काय पहिलीच वेळ नाही. अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. अशा प्रकारामुळेपोलीस खाते बदनाम होत आहे.त्यामुळे आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात हे बघण्यासारखे राहणार आहे.