हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर युवा नेते प्रशांत शिंदे यांनी आमदार राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. रविवारी प्रशांत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजप नेते माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या ताब्यात गेल्यामुळे याचा मोठा धक्का रोहित पवारांना बसला होता. त्यानंतर आता आमदार शिंदे यांनीच प्रशांत शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणल्यामुळे रोहित पवारांना आणखीन एक झटका मिळाला आहे.
रविवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीच्या युवा नेते प्रशांत शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. प्रशांत शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कर्जत जामखेड मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली गेली आहेत. मुख्य म्हणजे, युवा नेते प्रशांत शिंदे भाजपमध्ये गेल्यामुळे जवळा ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. तर, या मतदारसंघातून राष्ट्रवादीची सत्ता उतरली आहे.
दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “जवळा ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नव्हता. निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली आणि जिंकली. आता गावाच्या विकासासाठी भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत आहोत. हा निर्णय सर्वांनी एकमुखी घेतला आहे. आमदार शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करत गावचा विकास हाच भाजपचा संकल्प आहे”