यात्रेला मटण खायला न आल्याने युवकाचा खून; बाजार समितीच्या माजी संचालकासह ५ जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सध्या यात्रांचा सिझन चालू आहे. ताज्या यात्रेला पुरणाच्या पोळ्या आणि शिळ्या यात्रेला मटण, चिकन असा बेत महाराष्ट्रातील अनेक यात्रांमध्ये दिसून येतो. मित्र-मंडळी आणि नातेवाईकांना एकत्र बोलावण्याचा योग यात्रेनिमित्त साधला जातो. यामध्ये शिळ्या यात्रेदिवशी मद्यपी लोकांचा ‘वेगळा डाव’ त्यांच्या नियोजनानुसार रंगतो हे नवीन सांगायला नकोच. यात्रेवेळी वर्चस्वातून होणारी हाणामारी, भांडणतंटे हे पण चित्र नवीन नाही. मात्र यात्रेला मटण खायला आला नाही म्हणूनच कुठल्या मित्राचा खून झाला असेल तर?

पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजाराम मोरे या निष्पाप युवकाचा मटणाचं जेवण जेवायला आला नाही म्हणून ५ जणांनी मिळून खून केला आहे. या खुनाचे मुख्य सूत्रधार बाजार समितीचे माजी संचालक दिगंबर वाघमारे असल्याची माहिती समोर आली आहे. या खुनाप्रकरणी दिगंबर वाघमारे यांच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. एवढ्या क्षुल्लक कारणावरुन खून का करण्यात आला याचा तपास तालुका पोलिसांकडून सुरु आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.