पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादात मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची आधी अपहरण करून पहाटेच्या सुमारास हत्या केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाठीमागील बाजूला हि घटना घडली आहे.
हितेश मुलचंदानी असे मृत युवकाचे नाव असून त्याचे वय अवघे २३ वर्ष आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. मृत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले आहेत. त्याच प्रमाणे त्याचा चाकूने गळा देखील चिरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत हितेशच्या मित्राची कासारवाडी येथील एका हॉटेल मालाका सोबत भांडणे झाली. किरकोळ वादाचे रूपांतर भांडतात होताच त्याच्या मित्राने हितेशला फोन लावाल आणि हितेशही इतर मित्रांना घेऊन त्या हॉटेलवर दाखल झाला. त्यांच्या वादाने चांगलाच पेट घेतल्या नंतर हितेशला चार इसमांनी गाडीत घालून पिंपरी चिंचवडमहानगर पालिका इमारतीच्या मागील बाजूस नेवून ठार केले. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.