हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) काँग्रेसने (Congress) मोठा डाव टाकला आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वायएसआर यांच्या कन्या वायएस शर्मिला (YSR Sharmila) यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आगामी काळात आंध्र प्रदेशात भाऊ- बहिणी मध्ये जोरदार लढाई पाहायला मिळू शकेल. यापूर्वी माजी प्रदेशाध्यक्ष जी रुद्र राजू यांनी राजीनामा दिल्यानंतर वायएस शर्मिला यांना पक्षाची कमान सोपवण्यात होईल अशी चर्चा सुरु होतीच, अखेर तेच खरं ठरलं असून आंध्र प्रदेशात आगामी राजकारण कस कस होतेय हे पाहायला हवं.
वायएस शर्मिला या आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगन मोहनमोहन रेड्डी यांच्या बहीण आहेत. त्यांनी अलीकडेच दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तिची YSR तेलंगणा पार्टी (YSRTP) पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केलं होती. यानंतर आपल्या दमदार कामगिरीमुळे त्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात काँग्रेसच्या प्रमुख नेत्या म्हणून उदयास आल्या आहेत. तर दुसरीकडे जी रुद्र राजू यांची काँग्रेस कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Congress appoints YS Sharmila party chief in Andhra Pradesh
Read @ANI Story | https://t.co/Jyo4e4ksKb#Congress #yssharmila #AndhraPadesh pic.twitter.com/6NXaLZi4Yw
— ANI Digital (@ani_digital) January 16, 2024
तेलंगणात काँग्रेसने भारत राष्ट्र समितीला सत्तेतून बाहेर काढलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर आता या वर्षी अंदाजे एप्रिल- मे मध्ये लोकसभेबाबत आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावेळी काँग्रेसला मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या समोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. त्यामुळे आता वायएस शर्मिला यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने आंध्र प्रदेशमध्ये बहीण- भाऊ आमने सामने पाहायला मिळतील.