सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी आज भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदीर पॅलेस येथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांची झालेली भेट विकासकामांवर आधारित असल्याचे बोलले जात असले तरी या भेटीमागे जिल्हा बँकेचे काही समीकरण दडले आहे का? अश्या चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात सध्या जिल्हा बँकेची निवडणुक सुरु आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यात मेळावे घेत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील यांचे जवळचे व विश्वासू असलेले अपक्ष निवडून येऊन सुद्धा त्यांना राष्ट्रवादीने जिल्हा परिषदचे अध्यक्ष केले आहे. उदय कबुले आज जलमंदीर पॅलेसवर दाखल झाले. त्यांनी भाजपचे खा.उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन विकास कामांवर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांच्या या भेटी नंतर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप- राष्ट्रवादी असे नवीन समीकरण तयार होतय काय अशी चर्चा सुरु झाली आहे.