विकृतपणाचा कळस!! ऑर्डर कॅन्सल केली म्हणून डिलीव्हरी बॉयने रागाच्या भरात महिलेचं फोडलं नाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | झोमॅटो (zomato) अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केल्याची घटना बंगळुरू मध्ये घडली आहे. या मारहाणीत महिलेचे नाक फुटले. हा सर्व प्रकार खुद्द महिलेने व्हिडीओ शेअर करुन सांगितला आहे. घरात घुसून आपल्याला मारहाण झाली असल्याचं महिलेने सांगितलं आहे. कंटेंट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने मारहाणीनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला असून नाकातून रक्त वाहताना दिसत आहे.

व्हिडीओत ती सांगते की, “सकाळपासून मी काम करत असल्याने झोमॅटोवरुन जेवण मागवलं होतं. मी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ऑर्डर दिली, जी साडे चार वाजेपर्यंत येणं अपेक्षित होतं. ऑर्डर वेळेत न आल्याने मी वारंवार फोन करत होती. एक तर मला मोफत द्या किंवा मग ऑर्डर रद्द करा असं मी कस्टमर केअरला सांगत होते”.

https://twitter.com/HChandranee/status/1369486163140956160?s=20

त्यानंतर झोमॅटो डिलिव्हरी बॉय आला. तो खूप उद्धट होता. मी दरवाजा पूर्णपणे न उघडता त्याला आपण कस्टमर केअरशी बोलत असल्याचं सांगितलं. ऑर्डर उशिरा आल्याने आपल्याला ती नको असल्याचं त्याला सांगितलं. यावेळी त्याने नकार देत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मी तुमचा नोकर आहे का ? असं तो विचारत होता. मी खूप घाबरले आणि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण तो दरवाजा ढकलून आतामध्ये आला, माझ्याकडून ऑर्डर खेचून घेतली आणि नाकावर ठोसा मारुन पळ काढला,” असं हितेशाने आपल्या चार मिनिटांच्या व्हिडीओत सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’