नागपूर | १ ऑगस्टपासून मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहात नागरिकांना बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. बाहेरचे खाद्यपदार्थ आत घेऊन जाण्यास मज्जाव करणाऱ्या मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांवर सरकार कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत अाज दिली आहे.
पुण्यात काही महिन्यापूर्वी सामान्य नागरिकांनी मल्टिफ्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या अवास्तव दराचा विरोध केला होता. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनी मल्टिफ्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या अवाजवी दरांचा खरपूरस समाचार घेतला होता. तसेच मनसेने मल्टिफ्लेक्सच्या विरोधात ‘खळखट्याक’ आंदोलन सूरु केले होते. सरकारच्या या निर्णयाचे सर्वसामान्य लोकांनी स्वागत केले आहे. मल्टिफ्लेक्स चित्रपटांच्या मुजोर धोरणाला अटकाव केल्याने लोक आनंदी आहेत.