करमाळा प्रतिनिधी | राष्ट्रवादीशी बंडखोरी करत, शिवसेनेत रश्मी बागल यांनी प्रवेश केला.बागलांच्या प्रवेशामुळे नारायण पाटील यांचे तिकीट सेनेने कट केले होते. बागलांचा विजय सेनेच्या तिकिटावर येईल असा विश्वास होता. मात्र अपक्ष संजय शिंदे यांनी त्यांचा तब्बल २५ हजार मताधिक्याने पराभव केला. तर नारायण पाटील यांनी शिंदेंना चांगलीच टफ दिली, खेचा खेचीच्या निकालानंतर शिंदे विजयी झाले.
पण राष्ट्रवादीशी बंडखोरी करून, सेनेत गेलेल्या रश्मी बागल यांचं पुढं काय ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे. सेनेमध्ये गेल्या वर, आदिनाथ व मकाई साखर कारखाना चांगला चालविण अशा म्हणणाऱ्या रश्मी दीदी कुठं गेल्या ? असा प्रश्नही सर्व सामान्यांच्या मनात येत आहे.
रश्मी बागल अवघे ५२ हजार मते पडली होती. यावरून समजते की जनता त्यांच्यावर नाराज आहे. आदिनाथ सहकारी कारखाना येथील कामगारांच्या पगारी व शेतकऱ्यांची बिले दिली नाहीत, म्हणून जनता त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते. पण बागलांचे पुढे काय ह्या प्रश्नाचे उत्तर आणखी मिळाले नाही.