हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसची भीती जगभर पसरली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझरने कोरोना या विषाणूच्या संसर्गाला आंतरराष्ट्रीय साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. या आजारामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. काही लोकांच्या दुर्लक्षामुळे हा आजार सतत पसरत आहे. अशीच एक घटना दक्षिण कोरियामध्ये पाहायला मिळाली, जिथे एका महिलेमुळे हजारो लोक या विषाणूचा बळी ठरले.
खरं तर, कोरोना विषाणूची लागण झालेली एक महिला सकाळी प्रार्थना करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या शेंचेजी चर्चमध्ये गेली.त्यावेळी चर्चमध्ये सुमारे १२०० लोक होते. ज्यामुळे ते सर्व व्हायरसने संक्रमीत झाले. यानंतर ही महिला रुग्णालयात दाखल झाली. मग या महिलेला हलका ताप आला. त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यानंतर, त्याच रुग्णालयात दाखल झालेल्या ११९ लोकांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले.
यानंतर,१४ फेब्रुवारी रोजी ही महिला क्वीन्स वेल हॉटेलमध्ये जेवायला गेली. जिथे बर्याच लोकांना या विषाणूची लागण झाली.ज्यामुळे दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत. महिलेच्या तपासणीचे वेळेत निदान न झाल्यामुळे सुमारे ५००० लोकांना संसर्ग झाला. या काळात बर्याच लोकांनी आपले प्राण गमावले.
सोल मेट्रोपॉलिटन सरकारने या महिलेविरूद्ध बिना हेतू खुनाची तक्रार दाखल केली आहे. तथापि, बहुतेक लोकांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी जास्तीत जास्त घरीच रहावे. जेणेकरून या विषाणूपासून बचाव करण्यात यश मिळेल.या विषाणूमुळे देशात कर्फ्यूसारख्या परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. बरीच शहरे लॉकडाऊन केली आहेत. म्हणूनच, सरकार लोकांना वारंवार त्यांच्या स्वत: च्या घरात राहण्याचे आवाहन करीत आहे. जेणेकरून या विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखता येईल.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००
खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट
कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा पसरला संसर्ग ?
तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश