औरंगाबादेत चोरीचे सत्र काही थांबेना, महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले

0
131
प्रातिनिधिक संग्रहित
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी। औरंगाबादेत चोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. शेतवस्तीतील घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण करीत महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री मिसारवाडी भागात घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीच वातावरण पसरलय.

मिसारवाडी भागात प्रकाश पारगावकर यांची शेती आहे. या शेतीत गजानन सोनाजी सणांसे हे बटाई ने शेती कसतात, शेतात दिवसभराचे काम आटोपून नित्यप्रमाणे ते रात्री 9 च्या सुमारास झोपले त्यानंतर शेजारी राहणाऱ्या बहिणीचे आवाज ऐकून ते जागे होताच बाहेर आले असता तेथे त्यांना दरोडेखोर दिसले. त्या दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करून धमकावत घरात जाण्यास सांगितल.

घरात येताच त्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडल आणि काढता पाय घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दुपारपर्यंत पोलीस प्रक्रिया सुरू होती. मात्र, औरंगाबाद शहरात चोरीचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र सध्या तरी कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here