हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स म्हणजेच MCA विद्यार्थ्यांना 3,500 रुपयांमध्ये लॅपटॉप देत असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल बातमीनुसार, MCA कोविड -१९ च्या काळात 8 वी ते पीयूसी 1 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या उद्देशाने 3,500 रुपयांचे लॅपटॉप देणार आहेत. पीआयबी (PIB) ने या बनावट दाव्याची चौकशी केली असता त्या बातमीचे सत्य समोर आले. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने सांगितले की,’हा दावा खोटा आहे.’
याची सत्यता काय आहे?
भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या जाहिरातीला बनावट असल्याचे म्हटले आहे. पीआयबी फॅक्ट चेक याबाबत म्हणाले की, MCA कोविड -१९ च्या काळात ऑनलाइन शिक्षणाच्या उद्देशाने लॅपटॉप देत नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी अत्यंत चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
3500 रुपयांत लॅपटॉप
या व्हायरल बातमीत असा दावा केला गेला आहे की, 3500 रुपयांत लॅपटॉप घेण्याची शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2020 आहे. अर्ज केल्यानंतर लॅपटॉप 30 दिवसांत डिलिव्हर केला जाईल. हा लॅपटॉप लावा, लेनेव्हो आणि एटीएस कंपनीचा असेल. ज्यामध्ये Windows 10 OS, Intel Atom Processor, 32GB HDD Storage, ATS, 2GB RAM असेल.
ही कागदपत्रे आवश्यक असतील
या बनावट जाहिरातीनुसार लॅपटॉपसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागतील. यासाठी आपले आधार कार्ड, फोटो, विद्यार्थ्यांचे ओळखपत्र, पालकांचे आधार कार्ड, शिक्षकाचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर आवश्यक असतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.