जालना प्रतिनिधी |जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने तक्रारदार विलास कोल्हेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना घनसावंगी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आत्मदहन करणाऱ्या विलास कोल्हे यांना रोखून ताब्यात घेतले.
“वेळोवेळी तक्रार करून देखील न्याय मिळाला नाही म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचललं.” असा संताप विलास कोल्हे पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर व्यक्त करत होते. पोलिसांनी आणि तेथे उपस्थित लोकांनी कोल्हेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.