दगडाला पाझर फुटेल पण अजित पवारांचं रडणं ही काय भानगड? उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दांत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । ‘दगडाला पाझर फुटतो हे ऐकलं होतं पण अजित पवारांच्या डोळ्यांत अश्रू येतात हे पहिल्यांदाच समजलं’ अशी शेलकी टीका उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केली. शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे अहमदनगर येथे आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली.

१५ वर्ष सत्तेत असताना सत्तेचा शेंदूर चढवला, आणि आता विरोधी पक्षात बसायची वेळ आली की शेतकऱ्यांच्या दुःखाची आठवण झाली का असा सवाल उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना केला. नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेला शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली तेव्हा हेच नेते सत्तेत होते, मग तेव्हा अजित पवारांना शेतकऱ्यांचे दुःख कळाले नाही का? ज्याचं जसं कर्म त्याला ते तसं फेडावं लागतंच असं म्हणत अजित पवारांची आजची दुर्दशा त्यांच्या हपापलेल्या वृत्तीमुळेच झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

इतर काही बातम्या-