ना अजित, ना सुप्रिया; ‘हा’ असणार शरद पवारांचा राजकीय वारस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय वारसाची घोषणा केली आहे. एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखती दरम्यान पवार यांना तुमचा राजकीय वारस कोण असणार असा प्रश्न केला असता पवार यांनी त्यावर भाष्य केले आहे.

शरद पवार यांनी यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे नाव न घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पवार घराण्याचा राजकिय वारस कोण हे जनताच ठरवेल असं सांगत रोहित पवार किंवा पार्थ पवार आपले राजकीय वारस असतील असं पवार यांनी स्पष्ट केलंय.

पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. आता नातू रोहीत कर्जत जामखेड मतदार संघातून विधानसभा लढवत आहेत. जनता ज्यांला पुढे करेल तोच माझा राजकीय वारस असेल असं पवार यांनी स्पष्ट केल्याने रोहीत पवार हेच पवारांचे वारस असू शकतात असं बोललं जातंय.

इतर महत्वाच्या बातम्या –