मुंबई प्रतिनिधी। निवडणुकांचा प्रचार खऱ्या अर्थाने निवडणुकीतील चिन्हांमुळे रंगात येतो. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे त्यांना कमीत कमी कालावधीत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम यशस्वीपणे करावे लागते. त्यामुळे रोजच्या वापरातील आणखी ओळखीच्या चिन्हाला अपक्ष उमेदवारांची मागणी असते. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने लोकप्रिय गोष्टींचा चिन्ह म्हणून समावेश केला आहे.
विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी 207 प्रकारची चिन्हे दिली आहेत. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पक्षांकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी 10 तर अपक्ष व नोंदणीकृत पक्ष नसलेल्या उमेदवारांसाठी 197 प्रकारची मुक्त चिन्हे दिली आहेत. आयोगाने चिन्हे निश्चित करताना नव्या व जुन्यांचा मेळ घालत लोकप्रिय लुडो चिन्हाचा नव्याने समावेश केला आहे. दैनंदिन वापरातील अधिकाधिक वस्तू कशा राहतील याचीही काळजी घेतली आहे. तसेच 94 जुनी चिन्हे आयोगाने कालबाह्य देखील केली आहेत.
चिन्हांची निवड करताना आयोगाने पॅंट, चप्पल, बूट, फ्रॉक, टोपी, पर्स, अंगठी, बेल्ट आदी वस्तूंचा वापर केला आहे. लोकसभा निवडणुकीत 301 चिन्हे आयोगाने दिली होती. यामध्ये राष्ट्रीय पक्षांसाठी सात चिन्हे, राज्यस्तरावरील पक्षांसाठी 64 तर अपक्ष उमेदवारांसाठी 230 प्रकारच्या चिन्हांचा समावेश होता. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने 94 चिन्हे कमी केली आहेत. यामध्ये राज्यस्तरावरील चिन्हे कमी केली आहेत, तर काही मुक्त चिन्हांमध्ये बदल केला आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या बसपासाठी हत्ती, भाजपचे कमळ, कम्युनिस्ट पार्टीचे कणीस आणि विळा, कम्युनिस्ट पार्टी मार्क्सचे हातोडा, विळा आणि तारा, कॉंग्रेसचा हाताचा पंजा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ, राष्ट्रीय जनता पार्टीचे पुस्तक, मनसेचे रेल्वे इंजिन तर शिवसेनेचे धनुष्यबाण ही 10 चिन्हे संबंधित पक्षांसाठी राखीव आहेत.
निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी समाविष्ट केलेल्या मुक्त चिन्हांमध्ये नरसाळे, तंबू, हेल्मेट, सिमला मिरची, लायटर, फुलकोबी, कोट, दरवाजाची घंटी, नरसाळे, हेलिकॉप्टर, टायर्स, लोकर व सुई, कपाट, दुर्बिण, ऊस शेतकरी, हेल्मेट, पत्रपेटी, जेवणाचे ताट, करवत, स्टेप्लर, व्हॅक्यूम क्लीनर, सफरचंद, बिस्किट, ड्रील मशीन, गॅस सिलिंडर, हॉकी आणि बॉल, मटार, प्लेट स्टॅंड, शाळेचे दप्तर, स्टेथोस्कोप, अशा वेगवेगळ्या चिन्हांचा समावेश