पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसलाय. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आलाय. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि पुणे जि.प. चे सदस्य रोहित पवार यांनी पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले असे म्हणत अहिर यांचा निषेध केलाय.
‘संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले.’ असे म्हणत पवार यांनी अहिर संधीसाधू निघाल्याचं म्हटलंय. ‘आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं’ असं म्हटलंय.
तसेच ‘पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते’. असं म्हणत रोहित यांनी ‘तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं’ असे म्हणुन सचिन पवारांची तुला भरडं पीठाशी केलीय.
हे पण वाचा –
शरद पवारांसाठी ‘या’ १३ व्यक्ती आहेत खास; अजित पवारांचा समावेश नाही!
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट