भाजपाने आपल्या कोट्यातील एक जागा आरपीआयला द्यावी – रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई ।  येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. या ४ जागांपैकी एक जागा भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला द्यावी अशी मागणी आज रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पाठविले आहे. रामदास आठवले यांनी विधान परिषदेची एक जागा जागा मिळावी म्हणून मोर्चेबांधणी सुरु केली असून आगामी निवडणुकीत एक जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी ते आग्रही आहेत.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या निवडणूकीला परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर शिवसेनेकडून दोन नाव निश्चित करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हेंचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याकडून अद्याप उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment