शेतकरी प्रश्नांनावरून भाजपाने आज सभागृहात आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यन्त कामकाज स्थगित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर या विषयावर चर्चा सुरु असताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. या हाणामारीनंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला.
Nagpur: Leader of Opposition Devendra Fadnavis raised the issue of losses to farmers due to untimely rainfall, in the Maharashtra assembly, today. BJP MLAs raised slogans against the government. #Maharashtra pic.twitter.com/uGJxoH14kZ
— ANI (@ANI) December 17, 2019
तसेच मंत्री जयंत पाटील, एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 30 मिनिटं स्थगित करण्यात आले होते. यानंतर सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात अत्यंत चुकीचं घडलं. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा कुणाला अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकावणं चुकीचं आहे, सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो असं सांगत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरु केलं आहे.