‘माझी कर्मभूमीच माझा मतदारसंघ असणार’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी | ‘माझी कर्मभूमीच माझा मतदारसंघ असणार’ असल्याचं स्पष्टीकरण युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. शिवसेनेची जन आशिर्वाद यात्रा जालना जिल्ह्यात आली असता ते बोलते होते. आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही यावर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघ हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असेल अशी घोषणा शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र संपूर्ण महाराष्ट्र फिरून झाल्यावर पुढचा निर्णय घेणार असल्याचं आदित्य यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर जनता काय आदेश देतील याचाही मी अंदाज घेत असून माझी कर्मभूमीच माझा मतदारसंघ असणार असल्याचं आदित्यंनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर युती धर्मात आमच्याकडून कोणतीही गद्दारी होणार नसून शिवसेना पदाच्या मागे धावणारी नाही असंही ठणकावून आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Leave a Comment