#HppyDiwali | दिवाळी म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. घराची साफसफाई, कंदिल लावणं, रांगोळ्या काढणं यांसारख्या गोष्टींची तयारी केली जाते. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिवाळीचा फराळ. चिवडा, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, करंज्या आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांच्याच आवडीची चकली यांसारख्या पदार्थांची सर्वांच्याच घरात रेलचेल असते. लहान मुलांपासून ते घरातील थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी गोल चकली खाण्यासाठी सर्वच आतूर झालेले असतात.
साहित्य :
500 ग्रॅम तांदूळ
250 ग्रॅम फुटाणे
2 चमचे तीळ
तिखट
मीठ चवीनुसार
हिंग
हळद
तेल
कृती :
- तांदूळ धुवून वाळवा व गिरणीतून दळून आणा.
- फुटाण्याची पूड करावी आणि ती चाळून घ्यावी.
- तांदळाचे पीठ कोरडेच भाजून घ्या.
- थोडं भाजल्यानंतर त्यामध्ये फूटाण्याची पूड, तिखट, हळद, हिंग आणि मीठ घालून पुन्हा पिठ भिजवून घ्या.
- पिठं भिजवण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.
- लगेचच चकल्या पाडून तेलात तळा.
- गरमागरम कुरकुरीत चकल्या खाण्यासाठी तयार आहेत.