‘रंगात रंगलेली – फोटोजेनिक दिवाळी’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिवाळी विशेष | शुभम जोशी

दिवाळी आता ४ दिवसांवर आली आहे. वर्षभरात घडलेल्या बऱ्या-वाईट गोष्टी विसरून नव्या वर्षासाठी नवी ऊर्जा देणारा हा सण..या सणाची रंजकता उघड्या डोळ्यांनी तर आपण पाहतोच..पण सगळ्यांनाच सगळ्या ठिकाणी ते अनुभवता येतं असं नाही. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांसाठी मोहक आणि आल्हाददायी वातावरणातील दिवाळीचं फीलिंग सातारा नगरीतून आम्ही फोटोच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही फोटो येतायत बरं का..त्यासाठी तुम्हाला वाट पहावी लागेल पण..!! कसे वाटतायत फोटो नक्की कळवा..हे सर्व फोटो काढले आहेत – शुभम जोशी या साताऱ्यातील हरहुन्नरी छायाचित्रकाराने..

WhatsApp Image 2019-10-22 at 9.25.44 PM
दिवाळी म्हटलं की रंगीबेरंगी वातावरणाचा सडा सगळीकडे पडलेला दिसतो. तो रंग कपड्यांमध्ये, दिवाळी फराळात आणि आकाशकंदिलामध्ये दिसून येतो. रंगीबेरंगी रांगोळीमुळे बाह्य वातावरण अधिक प्रसन्न होतं. त्यामुळे या रंगांकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही..!!
WhatsApp Image 2019-10-22 at 9.30.44 PM
आकाशदिवे सगळीकडेच असतात. काही लहान, काही मध्यम तर काही मोठे..प्रकाशाची पखरण करण्यासाठी आकाशकंदिलांसारखा हक्काचा जोडीदार नाहीच..!!
WhatsApp Image 2019-10-22 at 9.49.09 PM
वसुबारस – शहरात गायींची पूजा कुठे करणार? असूदे मनातला भाव मूर्तीमध्ये पाहता येतोच की..द्या एक।गोमाता आम्हालापण..!!
WhatsApp Image 2019-10-22 at 9.42.57 PM
रंगात रंगूनी रंग माझा वेगळा..
WhatsApp Image 2019-10-22 at 9.43.48 PM
जगण्यातली शायनिंग आणि डेकोरेशनमधली लायटिंग..सण-उत्सवाला आणखी रंगत आणतात..!!
WhatsApp Image 2019-10-22 at 9.46.20 PM
खरेदीसाठी पर्याय अनेक, पण ते उपलब्ध करून देणारी जागा मात्र एक – आपली हक्काची – बाजारपेठ
WhatsApp Image 2019-10-22 at 9.53.24 PM
सूर्य प्रकाश द्यायचा थांबणार नाही, पण काहीवेळा सूर्यापेक्षा पणतीचा मिणमिणता प्रकाशच जास्त गरजेचा असतो. अंधकारमय जीवनात आशेची पहाट आणणारा दिवाळी सण, आणि त्यात स्वतःमध्ये तेज घेऊन जगणारी पणती..मस्त कॉम्बिनेशन आहे बघा..!!

 

WhatsApp Image 2019-10-22 at 10.05.17 PM
छायाचित्रकार –