राजू शेट्टी खा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीला; मनधरणीचा प्रयत्न

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी खा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीला साताऱ्यात गेले असून उदयनराजेंच्या मनधरणीचे पुन्हा प्रयत्न सुरु असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

उदयनराजे भोसले विरोधी पक्षाचा बळकट आवाज आहेत. सर्वसामान्यांच्या आवाजासाठी तुमच्या सारख्या विरोधी पक्षनेत्याची गरज असल्याचं यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान राजू शेट्टी यांनी आहे म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केलाय. त्यातच खासदार उदयनराजे भोसले हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळं राजू शेट्टी यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना भाजपात प्रवेश न करण्याची विनंती केली असल्याची चर्चा ही ऐकायला येत आहे. यावर बोलताना भाजपात प्रवेश करायचा की नाही. हा निर्णय मी अजून घेतला नाही. असे उदयनराजे यांनी यावेळी बोलताना म्हंटल आहे.