पुणे | काटेवाडीतील गोल रिंगण पार पाडून संत तुकाराम महाराजांची पालखी सणसर मुक्कामी पोहोचली आहे तर चांदोबाच्या लिंबाचे उभे रिंगण पार पाडून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरटगावी मुक्कामी पोहोचली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा प्रवास बारामतीतून सुरू झाला. दुपारच्या विसाव्याला काटेवाडीत आलेल्या पालखीचे इथे गोल रिंगण संपन्न झाले. काटेवाडीच्या गोल रिंगणाची विशेष बाब म्हणजे या गोल रिंगणात मेंढ्या धावतात. अनेक वर्षाची ही परंपरा असल्याचे बोलले जाते.
ज्ञानोबांच्या पालखीने चांदोबाच्या लिंबा जवळ उभे रिंगण पार पाडले. पालखी तरटगावी मुक्कामी गेली. विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी भूक तहान विसरले आहेत. जसजशी पंढरी जवळ येईल तस तसा त्यांचा उत्साह वाढत आहे.