लॉटरी.. एकाच उमेदवाराला दोन पक्षांकडून उमेदवारी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘तिकिटासाठी केवढी मारामार चालते’ हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु, जिथे एक तिकीट मिळायला कठीण तिथे एकाच उमेदवाराला एकाच विधानसभा मतदारसंघासाठी दोन-दोन पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर काय म्हणाल? होय, हे खरंय!! करवीर विधानसभा मतदारसंघातून डॉ. आनंद गुरव यांना दोन पक्षांकडून उमेदवारीची ही लॉटरी लागली आहे.

काल ‘आप’ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत डॉ. आनंद गुरव यांचे नाव होते आणि आज ‘वंचित बहुजन आघाडी’ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतही त्यांचे नाव आहे. करवीर विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचे नाव दोन्ही पक्षांनी फायनल केले आहे, यावर आता डॉ. आनंद गुरव काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान सुरेश जाधव-शिराळा, डॉ. आनंद गुरव- करवीर, बबनराव कावडे- दक्षिण कोल्हापूर, बाळकृष्ण देसाई- दक्षिण कराड, डॉ. बाळासाहेब चव्हाण- कोरेगाव, दीपक शामदिरे- कोथरुड, अनिल कुऱ्हाडे- शिवाजी नगर, मिलिंद काची- कसबा पेठ, शहानवाला जब्बार शेख- भोसरी, शाकिर तांबोळी- इस्लामपूर, किसन चव्हाण- पाथरडी-शेवगाव, अरुण जाधव- कर्जत-जामखेड, सुधीर पोतदार- औसा, चंद्रलाल मेश्राम- ब्रम्हपुरी, अदविंद सांडेकर- चिमूर, माधव कोहळे- राळेगाव, शेख शफी अब्दुल नबी शेख- जळगाव, लालसू नागोटी- अहेरी, मणियार राजासाब- लातूर शहर, नंदकिशोर कुयटे- मोर्शी, अँड. आमोद बावने- वरोरा, अशोक गायकवाड- कोपरगाव अशी यादी वंचित ने दिली आहे.
तर ‘आप’चे उमेदवार अँड. परोमीता गोस्वामी (ब्रम्हापुरी, चंद्रपुर) , विठ्ठल गोविंद लाड (जोगेश्‍वरी ईस्ट, मुंबई), डॉ.आनंद दादु गुरव (करवीर, कोल्हापुर), विशाल वडघुले (नांदगाव, नाशिक), सिराज खान (कांदिवली, मुंबई), दिलीप तावडे ( दिंडोशी, मुंबई) या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Leave a Comment