सोलापूर प्रतिनिधी |सोलापूर जिल्ह्यातील अधिवेशन काळातील प्रश्न आणि उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्यातील 11 विधानसभांमधून विधिमंडळात अधिवेशनाच्या काळात एकूण 256 प्रश्न विचारले गेले होते. त्यामध्ये पंढरपूर-मंगळवेढ्याचे काँग्रेसचे आमदार भारत भालके सर्वाधिक 66 प्रश्नांनासह आघाडीवर आहेत तर प्रणिती शिंदे यांनी 61 वेळा प्रश्न विचारले आहेत.
विशेष म्हणजे नुकतेच राष्ट्रवादीमधून सेनेत गेलेले बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपलांनी विधिमंडळात तोंडच उघडलं नाही तर अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रेंनी फक्त 1 प्रश्न विचारला आहे. तसेच सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख या 92 वर्षीय आमदाराची उपस्थिती 94 टक्के आहे. त्यामुळे या सध्या असे चित्र निर्माण झाले आहे कि लोकांच्या अडचणी आणि विकासासाठी आवाज उठवण्यामध्ये भालके आणि शिंदे यांचाच बोलबाला आहे. आता या आकडेवारीचा विचार करून नागरिक कुणाला कशी पसंती देतायत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.