शरद पवार राज्यसभेवर बिनविरोध; ‘आमचे दैवत’ म्हणत अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा एकदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे दैवत असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आमचं दैवत, महाराष्ट्राच्या विकासाचे आधारस्तंभ, आदरणीय पवार साहेबांची राज्यसभेवर पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. आदरणीय साहेबांवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार!” असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानलेत. तसेच साहेबांचं नेतृत्व, मार्गदर्शन महाराष्ट्राला निश्चितच विकास पथावर नेईल, असा विश्वासही यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान भाजपकडून उदयनराजे भोसले, डाॅ. भागवत कराड, रामदास आठवले यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. तर राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी तर काँग्रेसकडून राजीव सातव यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

या बातम्याही वाचा –

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा