यवतमाळ प्रतिनिधी। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी शेतकरीच जबाबदार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी विवादास्पद वक्तव्य केलं आहे. यवतमाळ इथं बोलतांना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. शेतकरी जात पाहून मतदान करतो. त्यामुळं शेतकऱ्याची ही अवस्था आहे.
वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास कापसाला हमी भावाप्रमाणे पैसे मिळतील. तर जात पाहून मतदान केल्यास 3500 रु प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळणार. असं म्हणून प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एका नवीन वादाला मार्ग मोकळा केला. आता त्यांच्या या वक्तव्याचे शेतकरी वर्गात काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.