अहमदनगर प्रतिनिधी | मुघलांनाही लाजवेल असे काम कर्जत तालुक्यात वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केले आहे. केवळ वन जमिनीवर भात लागवड केली म्हणून आदिवासींचे उभे पीक या अधिकाऱ्यांनी संगनमताने उध्वस्त केले आहे. माझ्या राज्यातील रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये अशी शिवनीती होती.
सध्याचे राज्यकर्ते उठताबसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात आणि काम मात्र त्याच्या उलटे करतात. याचाच प्रत्यय कर्जत तालुक्यातील ओलमण भागात आला. आदिवासी बहुल भाग असलेल्या या भागातील आदिवासी शेतकरी हे येथील माळरानावर शेती करतात. मात्र शेती लावलेली जमीन ही वनखात्याची असल्याचे सांगत बहरून आलेले उभे पीक या अधिकाऱ्यांनी उध्वस्त केले. आदिवासी शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास काढून घेतला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून अनेकांनी याचा तीव्र निषेध केला आहे.
कर्जत तालुक्यात वनखात्याचा आणि सरकारी जमिनीवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. अनेक ठिकाणी माती माफिया डोंगरच्या डोंगर उध्वस्त करत आहेत. दगडांच्या खाणी मुळे डोंगर नामशेष होत आहेत. या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष करून आदिवासींना आणि कष्टकरी जनतेला त्रास देणे कितपत योग्य ? हा खरा प्रश्न या प्रकरणातून पुढे येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या –
'मोदी तर पेढेवालेसुद्धा' असं म्हणणार्या उदयनराजेंच्या प्रचाराला पंतप्रधान 'या' दिवशी सातार्यात
वाचा बातमी👇🏽 https://t.co/5s8B9cByeN
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019
Breaking | महादेव जानकर 'या' कारणामुळे पडणार महायुतीतून बाहेर?
वाचा बातमी👇#hellomaharashtra@BJP4Maharashtra@ShivsenaComms https://t.co/IPPgwx7Stt— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 6, 2019
देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाहेर पडणार?? काय आहे प्रकरण ?@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra@NCPspeaks @supriya_sulehttps://t.co/8Vb5gHJzqc
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 5, 2019