शेती, शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प- राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यांनतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आज सादर केलेल्या राज्य अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली. शेती, शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प मागील सरकारच्या अर्थसंकल्पापेक्षा नक्कीच चांगला आहे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.

नियमित कर्ज भरणाऱ्यांना ७५ हजार रुपये आणि थकीत वीज बिलासाठी ‘कृषी संजीवनी’ योजना आणली असती, तर अधिक आनंद झाला असता असही ते म्हणाले. शेतीसाठी १ रुपये १६ पैसे दराने समान वीज आकारणीची घोषणा अर्थमंत्र्यांकडून अपेक्षित होती. मात्र ती यावेळी झाली नाही. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment