सांगली जिल्ह्यामध्ये किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून मुलाने केला पित्याचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये बापलेकांचं भांडण झालं. या भांडणात मुलाने बापाच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून, भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत तीन दिवसात दुसरा खून झाल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये मुलाने बापाचा घरगुती वादातुन धारदार शस्त्राने भोसकून खुन केला. रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश महादेव वारे असे मृताचे नाव आहे. खून केल्यानंतर आरोपी किशोर वारे घटनास्थळावरून पसार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रकाश वारे शेतमजुरी करीत होते. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या पत्नीचे दोन वर्षापुर्वी निधन झाले आहे ते मुलाकडेच रहात होते. त्यांची सुन बाळंतपणासाठी माहेरी गेली आहे. आज रात्री दोघांमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर किशोरने वडीलांच्या छातीवर डाव्याबाजुस धारदार शस्त्राने वार केले. वार खोलवर झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर किशोर हत्यार घेऊन तेथुन पसार झाला. दरम्यान खुनाची घटना पोलिसांना समजतात भिलवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.