हॅलो महाराष्ट्र टीम, मयूर डुमणे, मुंबई : महाराष्ट्र ग्रामीण लघु उद्योग नावाची फेक वेबसाईट तयार करून बेरोजगारांची फसवणूक केली जात आहे. या वेबसाईटवरून अनेक तरुण ऑनलाईन अर्ज दाखल करत आहेत. या अर्जाची फी ९५ रुपये इतकी आहे. उमेदवारांची मूलभूत माहिती या अर्जाद्वारे भरून घेऊन ९५ रुपये अर्ज दारांकडून ऑनलाईन घेतले जात आहेत. या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाचा कोणताही लोगो नाही. कोणत्याही दृष्टिकोनातून ही सरकारी वेबसाईट वाटत नाही. अर्ज करताना उमेदवाराचा फोटो आणि सही घेणे महत्वाचे असते.
या वेबसाईटवर पोस्टची तारीख १२ नोव्हेंबर २०१९ अशी आहे. या फेक वेबसाइटवरून फोटो आणि सही घेतली जात नाही. अशाप्रकारे फेक वेबसाईटच्या आधारे बेरोजगारांची फसवणूक केली जात आहे. सामान्यतः महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची फी पेटीएम च्या माध्यमातून घेतली जात नाही. या फेक वेबसाइटवरून पेटीएम च्या माध्यमातून पैसे पे करायला लावून फसवणूक केली जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महापोर्टल महाराष्ट्रातील विविध पदांच्या जागांची भरती करते. महाराष्ट्र सरकारचे नाव वापरून हा भ्रष्टाचार सुरु आहे. या फेक वेबसाइटवरून अर्ज केलेला उमेदवार रोहिदास खेडकर म्हणाला की, महाराष्ट्र सरकारच्या नावाचा वापर करून गैरव्यवहार करणाऱ्या अशा फेक वेबसाईटवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. अशा फेक वेबसाईटच्या माध्यमातून होतकरू मुलांना लुबाडले जात आहे.
फेक वेबसाईटची लिंक
://maharashtragraminlaghuudyog.com/?gclid=Cj0KCQiA0ZHwBRCRARIsAK0Tr-qrDF4-Ky4aIpWcoxF8KbtC44O8KLCH-rbpKKyVFqj8sgBC2tLSGhcaAuU-EALw_wcB