हत्या झालेल्या शिक्षकाच्या नातेवाइकाने आत्मदहनाचा केला प्रयत्न

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी। बीड शहरातील सैनिकी विद्यालयाचे शिक्षक सय्यद सज्जाद यांची गुरुवारी हत्या करण्यात आली. त्यानंतर सज्जाद यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे नातेवाईक मोमिन कौसर यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर राँकेल ओतुन घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि इतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना वेळीच त्यांना पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

लब्बैक युवा मंचच्या माध्यमातून काम करत असलेले शिक्षक सय्यद साजेद यांची गुरुवारी दुपारी तिक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. या प्रकरणात या प्रकारात आरोपी गुज्जर खानसह तसेच सहभागी इतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. गुज्जर खानवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर तो अनेक गुन्हयात फरार आहे. विशेष म्हणजे मयत शिक्षक साजेद यांनी यापुर्वी अनेकदा पोलीसांकडे संरक्षणाची मागणी केली होती मात्र पोलीसांनी याची दखल घेतली नाही. असा आरोप सज्जाद यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान आज आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या कौसर यांनी सज्जाद यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. कौसर अली यांना एक कोटीची खंडणी मागण्यात आली होती. तसेच त्यांच घर जाळण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र त्या प्रकरणातही आरोपी गुज्जर खानला अटक झाली नव्हती. आता जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही. तो पर्यत प्रेत ताब्यात घेणारा नाही. अशी भूमिका मयत शिक्षक सज्जाद यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने तणावाच वातावरण निर्माण झाले आहे.