मुंबई : मी आणि माझे कुटुंब नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मी नाराज असल्याच्या अफवा आहेत, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळात विस्तारात संजय राऊत गैरहजर राहिल्यामुळे संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद न दिल्यामुळे संजय राऊत नाराज असल्याचे बोलले जात होते मात्र संजय राऊत यांनी या नाराजीचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे.
त्यांनी म्हंटले की, मी माझ्या भावासाठी कधी काही मागितलेच नाही. आम्ही मागणारे नसून देणारे आहोत. आम्ही पक्षासाठी योगदान देणारे लोकं आहोत. माझा भाऊ सुनील राऊत यांनी कधी मंत्री पद मागितले नाही पण काही लोक अशाप्रकारच्या अफवा पसरवत आहेत.
नाराज नेत्यांनी थोडा संयम ठेवावा
राऊत म्हणाले की, आमच्या जवळ खूप कमी विकल्प आहेत. हे तीन पक्षाचे सरकार आहे. क्षमता असलेले लोकं काँग्रेसमध्येही आहेत, आमच्या पक्षातही आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहेत. परंतु ज्या पक्षाच्या खात्यात जेवढे मंत्रिपदं आली आहेत तेवढीच मिळतील. शिवसेनेच्या नाराज नेत्यांनी थोडा संयम ठेवला पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार . चालले आहे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.