हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोरेगाव-भिमा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी हि माहिती दिली तसेच कोरोना संदर्भात राज्य सरकारची भूमिका देखील स्पष्ट केली
अजित पवार म्हणाले, राज्यात फक्त ५ दिवसांचे अधिवेशन भरवले होते तरीही आत्तापर्यंत १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहीजे, असं अजित पवार म्हणाले.
नव्या वर्षात राज्याला करोनामुक्त करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची बैठक झाली. साधारण दररोजचा आकडा लक्षात घेऊन किती पटीत रुग्णांची संख्या वाढतेय, ते बघून त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. पण रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली, तर नाईलाजाने अजून कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ शकते. असेही अजित पवार यांनी म्हंटल