जळगाव : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेमधील एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा खडसे समर्थक माजी नगरसेवक अपात्र ठरले आहेत. त्यामुळे खडसे (Eknath Khadse) गटाला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेचे तत्कालीन भाजप लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी आपला कालावधी संपण्याच्या आधी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश केला होता. यानंतर भुसावळ नगरपालिकेच्या भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी पक्ष बंदी कायद्यांतर्गत रमण भोळे यांच्यावर याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीत तत्कालीन नगराध्यक्ष तथा खडसे समर्थकांसह दहा नगरसेवकांना अपात्र ठरण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) गटाला मोठा धक्का बसला आहे.पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुसावळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 10 नगरसेवकांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. या निकालामुळे खडसे आणि भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर रमण भोळे, तर नगरसेवक पदावर अनुक्रमे अमोल इंगळे (प्रभाग 1 ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब) मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अॅड. बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते (22 ब), व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) हे निवडून आले होते. या लोकांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी 17 डिसेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांच्याकडून करण्यात आली होती. आता हे 10 नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच खडसे गटाला (Eknath Khadse) मोठा धक्का बसला आहे.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर