5 सप्टेंबरपर्यंत मिळणार PM Kisan योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे, अशा प्रकारे तपासा स्टेट्स !!!

PM Kisan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता PM Kisan सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता फारसे थांबावे लागणार नाही. सरकार कडून या महिन्यात 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, ज्या शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत आपल्या खात्याचे e-KYC केलेले नाही त्यांना हे पैसे दिले जाणार नाहीत.

What is PM-Kisan Samman Nidhi Yojana? Check Registration Process, Eligibility, Documents Required, Toll-free Number and More

PM Kisan बाबत बोलताना प्रधान सचिव डॉ. अरुण कुमार मेहता यांनी म्हंटले की,” पुढील 12 व्या हप्त्याचे 2,000 रुपये फक्त आधार लिंक केलेल्या खात्यातच ट्रान्सफर केले जातील.” तसेच 5 सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शासनाचे मुख्य लक्ष अपात्र लाभार्थ्यांना मिळणारे लाभ थांबवणे आणि त्यांना देण्यात आलेल्या पैशांची वसूली करणे हा आहे. PM Kisan योजनेंर्तगत आतापर्यंत 11 हप्त्यामध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.

पीएम किसान सम्मान निधि का इंतजार होगा खत्म, लाभार्थियों को 31 मई को 11वीं किस्त जारी करेंगे प्रधानमंत्री

PM Kisan सन्मान निधी योजनेविषयी जाणून घ्या

केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी PM Kisan सन्मान निधी योजना देखील एक आहे. या योजनेंतर्गत सरकारकडून अल्पभूधारक आणि सीमान्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. हे पैसे सरकार 3 समान हप्त्यांमध्ये पाठवते म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये ट्रान्सफर करते.

PM Kisan eKYC from your mobile at home process restored with Aadhaar based OTP - Business News India - PM Kisan eKYC: पीएम किसान की 11वीं किस्त के लिए बड़ी अपडेट, शुरू

e-KYC करावे लागेल

हे लक्षात घ्या कि, PM Kisan सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC बंधनकारक करण्यात आले आहे. e-KYC करण्यासाठीची शेवटची तारीख 31 जुलै ते 31 ऑगस्ट अशी वाढवण्यात आली होती. तसेच याचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना e-KYC शी संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अशा परिस्थितीत, जर आपण PM Kisan योजनेचे लाभार्थी असाल आणि e-KYC केले नसेल तर हप्त्याचे पैसे अडकू शकतील.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/

हे पण वाचा :

ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!

गेल्या 5 वर्षात Best Agrolife च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 6,900 टक्के रिटर्न !!!

ATM मधून पैसे काढण्यासाठी बँकांचे काय नियम आहेत ते समजून घ्या !!!

Post Office च्या ‘या’ योजनेत दररोज 95 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 14 लाख रुपये !!!

Tamilnad Mercantile Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा