Saturday, March 25, 2023

धक्कादायक ! PUBG खेळण्यासाठी एका 15 वर्षीय नातवाने आपल्या आजोबांच्या खात्यातून उडवले चक्क 2 लाख रुपये

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून PUBG Mobile चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अलीकडेच, केंद्र सरकारने बंदी घातलेल्या मोबाइल गेम अॅप PUBG च्या माध्यमातून मुलांना खूपच वाईट रीतीने व्यसनाधीन केले होते. PUBG (Player Unknown Battlegrounds) वर बंदी घातल्यानंतर एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका 15 वर्षीय नातवाने गेम खेळण्यासाठी आपल्या आजोबांच्या पेन्शन खात्याचा गैरवापर केला. नातवाने आजोबांच्या पेन्शन खात्यातून चक्क 2 लाखाहून अधिक पैसे काढून गेम खेळण्यासाठी उडवले. PUBG Mobile मध्ये ACE रँक मिळविण्यासाठी या नातवानेआपल्या आजोबांच्या खात्यामधून 2.34 लाख रुपये खर्च केले आहेत.

दिल्लीच्या तिमारपूरमध्ये एका 15 वर्षाच्या तरूणाने आपल्या 65 वर्षीय निवृत्त बीएसएनएल कर्मचारी असलेल्या आजोबांच्या बँक खात्यातून 2.34 लाख रुपये PUBG Mobile मध्ये ट्रांसफर केले. मे महिन्यात या व्यक्तीला दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या या ट्रांसफरची माहिती दिली असता हा विषय समोर आला. तिमारपूर पोलिस ठाण्यात याबाबतीत तक्रार दाखल केली गेली आणि नंतर उत्तर जिल्ह्यातील एका सायबर सेलकडे ती ट्रांसफर करण्यात आली, ज्याद्वारे असे समजले की, गेल्या आठवड्यात सरकारने बंदी घातलेल्या PUBG Mobile गेमसाठी ही रक्कम Paytm वर ट्रांसफर केली गेली.

- Advertisement -

हिंदुस्तान टाईम्सच्या माहितीनुसार फिर्यादीला त्याच्या मोबाइल फोनवर मेसेज मिळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मोबाईलवरील मेसेजनुसार तक्रारदाराच्या खात्यातून 2,500 रुपये डेबिट करण्यात आले होते, त्यानंतर त्याच्याकडे 275 रुपयेच शिल्लक होते. त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला जेथे त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या पेंशन अकाउंट मधून 2.34 लाख रुपये ट्रांसफर करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासणीनुसार त्यांच्या नातवाने हे पैसे आपल्या आजोबांच्या खात्यातून 7 मार्च ते 8 मे दरम्यान पैसे खर्च केले आहेत.

मात्र, 8 मे रोजी या युवकाच्या आजोबांना याचा एक संकेत मिळाला. त्यांना बँकेचा मेसेज मिळाल्यानंतर असे घडले की, त्यांच्या बँक खात्यातून 2,500 रुपये काढून घेण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या खात्यात एकूण 275 रुपयेच शिल्लक आहेत. मात्र, पोलिसांनी या तरूणाविरूद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही, हे समजल्यानंतर आजोबांनी तक्रार मागे घेतली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”