देशभरात गेल्या २४ तासांत आढळले १८ हजार ५२२ नवे कोरोनाबाधित, ४१८ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. मागील २४ तासांत देशभरात १८ हजार ५२२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोनामुळे ४१८ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहचली आहे. सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे देशभरात एकूण १६ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात ३ लाख ३४ हजार ८२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. २९ जूनपर्यंत देशभरात एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील २ लाख १० हजार २९२ नमूने काल तपासले गेले आहेत. देशभरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला, तरी कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्याही वाढताना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment