हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारताला तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलं असून पश्चिम बंगालची राजधानी असलेले कोलकाता आणि तामिळनाडूची राजधानी चेन्नई या दोन्ही शहरांना समुद्राची पातळी वाढल्याने धोका असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. समुद्राची वाढलेली पातळी आशियाई मेगासिटी सह वेस्टर्न ट्रॉपिकल पॅसिफिक बेटे आणि वेस्टर्न हिंद महासागर यांनाही प्रभावित करू शकतात.
जर समाजाने उच्च पातळीच्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन असेच सुरू ठेवले तर चेन्नई आणि कोलकाता या 2 शहरांव्यतिरिक्त यंगून, बँकॉक, हो ची मिन्ह सिटी आणि मनिला या इतर आशियाई शहरांनाही धोका आहे. नेचर क्लायमेट चेंज या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
दरम्यान, मागील वर्षी एप्रिल 2022 मध्ये सुद्धा अशाप्रकारे काही शहरे समुद्रात बुडू शकतात अशी शक्यता अभ्यासातुन वर्तवण्यात आली होती. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास, येत्या 28 वर्षांत भारतातील अनेक प्रमुख शहरे पाण्याखाली जाऊ शकतात. विश्लेषणानुसार, कोची, मुंबई, चेन्नई, तिरुअनंतपुरम, विशाखापट्टणम शहरातील काही भाग आणि रस्त्यांचे जाळे 2050 पर्यंत पाण्याखाली जाईल अशी शक्यता आहे.