हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये एक घटना धक्कादायक घटना घडली आहे. येथील प्रगती मैदान टनल जवळ दिवसाढवळ्या चार चोरट्यानी बंदुकीचा धाक दाखवत कार थांबवली आणि गाडीत बसलेल्या व्यक्तीकडून दोन लाख रुपये लुटले आहेत. घटना स्थळावरील CCTV फुटेजमध्ये ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. युथ काँग्रेसने हा विडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
इंडिया युथ काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून हा चोरट्यांचा विडिओ शेअर करत म्हंटल की, अमित शहा जी, हा व्हिडिओ पहा. दिल्लीच्या प्रगती मैदान बोगद्यात काही दुचाकीस्वार दिवसाढवळ्या येतात. आणि कार थांबवून कार चालकाकडून 2 लाख रुपये लुटतायत. आपल्या देशाच्या राजधानीत हे घडत आहे. तुम्ही पाहत आहात का? असं म्हणत काँग्रेसने अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेमकं काय घडलं?
सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दाखवल्याप्रमाणे, दिल्ली येथील प्रगती मैदान टनल मधून एक व्यक्ती फोर व्हीलर कार मधून पैसे घेऊन जात होता. त्याचवेळी दोन टू व्हीलर त्या कारच्या समोरून ओव्हटेक करत आल्या आणि त्यांनी त्या गाडीला थाबवलं. त्यानंतर एका टू व्हीलर वरील चोरटा गाडीवरून उतरला आणि ड्रायव्हर सीट जवळ जाऊन त्याने बंदूक दाखवली. तर दुसऱ्या चोरट्याने बंदुकीच्या भीतीने कारच्या मागचा दरवाजा उघडून कार मध्ये असलेल्या पैशांची बॅग घेतली आणि चौघांनी तेथून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार कार मध्ये असलेला व्यक्ती हा डिलिव्हरी एजंट असून पटेल सज्जनकुमार असं त्याचं नाव होतं. ते एका इंटरप्राईजेस मध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतात. 24 जूनला ते 2 लाख रुपये कॅश असलेली बॅग घेऊन लाल किल्ल्यापासून चांदणी चौकला चालले होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेला आहे. दिल्ली पोलीस या घटनेचा तपास करत असून या चोरट्यांना शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे. या सर्व चोरट्यांनी हेल्मेट घातलेले असून सीसीटीव्ही कॅमेरात त्यांच्या गाडीची नंबर प्लेट दिसत नाही.